सांगली : आष्टा खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

आष्टा : पोलीसनामा ऑनलाईन

जागेच्या  वादातून धनाजी हजारे (वय-२५) याचा चाकूने वार करुन खून करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आरोपी शिवाजी नायकू माने (वय-६०) याला आष्टा पोलीसांनी शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली. आरोपीने गुन्हा कबुल केला असून न्यायालयाने त्याला 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b630d035-c3fb-11e8-bf2d-7b4c4f4428b4′]

याबाबत आष्टा पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  या प्रकरणातील आरोपी शिवाजी माने व सचिन हजारे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून येथील बिरोबा मंदिरासमोरील जागेच्या कारणावरून वाद सुरू होता . गुरूवारी ( दि. २७ ) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या दोघामध्ये परत एकवेळ याच कारणावरून  येथील बिरोबा मंदिरासमोर म्हाकुबाई मंदिराजवळ जोरदार वादावादी झाली .यावेळी शिवाजी माने याने सचिन हजारे याच्यावर चाकूने सपासप तीन वार केले . सचिन रक्ताच्या थरोळ्यात पडला. यानंतर आरोपीने तेथून पळ काढला . यावेळी सचिनच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन त्याठिकाणी आलेल्या आशोक सिध्द याला शिवाजी माने याने मला चाकूने भोसकले असल्याचे सचिनने सांगीतले. अशोकने सचिनला उपचारासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
परंतु  पुढील उपचारासाठी त्याला सागली येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्याचे निधन झाले.

[amazon_link asins=’B078124279,B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1dc7bb3-c3fb-11e8-84b4-35f717472913′]

दरम्यान घटनेच्या दुसर्या दिवशी रात्री उशीरा आष्टा पोलीसांनी आरोपी शिवाजी माने याला अटक केली असून आरोपीने गुन्हा कबुल केला आहे . पोलीसांनी आरोपी माने याला शनिवारी दुपारी इस्लामपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे . आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शौकत जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.