‘बारामतीत’ लावलेला ‘तो’ बॅनर काढण्यात आला, कार्यकर्त्यांनी सांगितलं ‘हे’ कारणं

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही 80 वर्षांच्या योद्ध्यासोबत आहोत असा बारामतीत लावण्यात आलेला बॅनर काढून टाकण्यात आला आहे. राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आणि एका रात्रीत सत्तास्थापन झाली. या भाजपच्या सत्तेत राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी देखील राष्ट्रवादीशी फारकत घेऊन सहभाग घेतला. यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील पक्षात आणि कुटूंबात फुट पडली असे स्टेट्स ठेवले.

या दरम्यान याच सर्वाचे पडसाद बारामतीत पाहायला मिळाले. बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात फूट पाहायला मिळाली. युवा कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा नारा दिला तर काहींनी शरद पवारांचा नारा दिला. या दरम्यान बारामतीत शरद पवारांच्या आपण पाठिशी असल्याचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर लिहिले होते की आम्ही 80 वर्षाच्या योद्ध्यासोबत आहोत. हा बॅनर आता काढून टाकण्यात आला आहे.

कुटूंबात या अशा प्रकारच्या बॅनरमुळे कलह नको असे सांगत बारामतीतील काही कार्यकर्त्यांकडून हा बॅनर काढून टाकण्यात आला आहे. बारामती पवार कुटूंबाचा बालेकिल्ला मानला जातो. या बारामतीत पवार कुटूंबाचे मोठे समर्थक आहेत.

आज सकाळी राज्यातील बदललेल्या राजकारणाने महाराष्ट्राला धक्का दिला. अजित पवारांनी अचानक राजभवानावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीशी अजित पवार यांनी फारकत घेतल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यात चांगलाच गोंधळ उडाला.

Visit : Policenama.com