ते पाडलेलं सॅटेलाईट चीन किंवा पाकिस्तानचं ; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – भारताने आज अंतराळात सर्जिकल स्र्टाईक करत ‘ए सॅट’ या क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्राने एक लाईव्ह सॅटेलाईट उध्वस्त केल. हे सॅटेलाईट नेमकं कोणत्या देशाचं होतं. याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. परंतु, हे सॅटेलाईट पाकिस्तान किंवा चीनचं असल्याची शक्यता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी आमदार राहूल कुल आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन केलं.

भारतानं सॅटेलाईट पाडल्याची नरेंद्र मोदींची घोषणा त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितली. त्यानंतर भारतानं पाडलेलं ते सॅटेलाईट चीन किंवा पाकिस्तानचं असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. दरम्यान, या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली आहे. ते कोणत्या देशाचं आहे. याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु, भाजपच्या नेत्यांनाच या गोपनीय कारवायांची माहिती कशी मिळते असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुळात महसुलमंत्र्यांच्या या अजब दाव्याने खळबळ उडाली आहे.