पोलिसाकडून मुलीचे ‘अपहरण’

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण पोलीस असल्याचे सांगून चक्क एका इसमाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. लाखनी तालुक्यातील हा सर्व प्रकार असून निलेश हेडाऊ हा आरोपी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस स्टेशनचा कर्मचारीअसल्याचे उघड झाले आहे.

पीडित मुलगी बारावीला लाखनी येथील कॉलेजात शिकत होती. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता कॉलेज आटोपून राष्ट्रीय महामार्ग 6 गडेगाव इथं रस्त्यावर मैत्रीणीसोबत उभी होती. मैत्रिणीचे मामा येऊन ऎत्रिणीला घेऊन गेल्याने ती एकटीच उभी होती. तेवढ्यात तिच्यासमोर आलेल्या कारमधून भंडारा रोडला कस जायचं ? असं विचारण्यात आल तिने पत्ता सांगितल्यानंतर कारमधील व्यक्ती म्हणाला, मी पोलीस आहे तुम्हाला भंडारा येथे सोडतो असे म्हणून तिला गाडीत बसवले.

पोलीस असल्यामुळे पीडितेने विश्वास ठेवून गाडीतून प्रवास सुरु केला मात्र काही अंतर गेल्यावर इसमाने पीडितेची छेड काढायला सुरुवात केली. पीडितेने विरोध करत जोरात गाडीचे स्टेरिंग फिरवले आणि गाडी एका ठिकाणी जाऊन आदळली. त्यामुळे संतापलेला चालकाने तिला फेकून दिले आणि तो पसार झाला. त्यानंतर पीडितेने लाखनी येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी कारवाई करत 72 तासांत आरोपी निलेश हेडाऊ याला अटक केली. आरोपी स्वत: पोलीस निघाल्याने पोलिसांना देखील धक्का बसला. या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सुरु आहे.