Lockdown : स्वगृही पोहचताच 2 वर्षाच्या मुलीसमोर बापानं सोडला जीव, प्रशासन हादरलं

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमध्ये अडकलेले हजारो मजूर पायपीट करत मूळगावी परतत आहे. मात्रा, शेकडो किलोमीटरचा प्रवासादरम्यान अपघाताच्या अनेक घटना घडल्याचे दिसून आले आहे. अशाीच एक घटना गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यातील रामंजापूर येथे घडली आहे. कामानिमित्त तेलंगणाला गेलेला महाराष्ट्रातील मजूर कसाबसा राज्यात पोहोचला होता. दुर्दैवाने अतिताणानंतर लेकीला पाहिल्यानंतर त्याने जीव सोडला आहे.

मजुरीच्या कामासाठी दाम्पत्य तेलंगणाच्या करीमनगर इथे गेले होते. परंतु, लॉकडाउनमुळे हे दाम्पत्य जिल्ह्याची सीमा बंद असल्यामुळे अडकून पडले होते. मजुरीसाठी काम करत असताना मागील महिन्यात 5 एप्रिलपासून मजुराची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर करीमनगर इथे एका खासगी रुग्णालयात उपचार झाले. शनिवारी सकाळी कुटुंबाने गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खासगी वाहनाने प्राणहीता नदीच्या पुलावरील तेलंगणाच्या सीमेपर्यंत ते पोहचले. मजूर त्याची पत्नी, 14 वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी धर्मपुरी येथील शासकीय आश्रमशाळेजवळ येताच मजुराला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही कळायच्या आताच अचानक या मजुराचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने तेलंगणातून आलेल्या इसमाचा महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल होताच मृत्यू झाल्याने प्रशासकीय यंञणा हादरली आहे.