संगम पूलावरुन तरुणाने मारली उडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा येथील संगम पूलावरुन एका तरुणाने उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान उडी मारलेला तरुण बेपत्ता  झाला असून, अग्निशमक दलाकडून त्याचा शोध घेतला जात आहे. रात्री उशिरापरीयंत त्याचा शोध लागलेला नव्हता.

अग्निशमकने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील संगम पूलावरुन एका तरुणाने नदीपात्रात उडी मारल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार येरवडा अग्निशमक विभागासह नायडू आणि देवदूतच्यावतीने तरुणाचा शोध घेण्यात आला. मात्र, रात्री सात वाजेपर्यंत तरुणाचा शोध लागला नाही. अंधार पडल्यामुळे शोधमोहिम थांबविण्यात आली.

उद्या सकाळी पुन्हा तरुणाचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती अग्निशमक विभागाने दिली आहे.  त्याचे नाव किंवा इतर माहिती मिळू शकलेले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/