पुण्यातील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन – स्वस्तात सोन्याच्या आमिषाने पुण्यातील व्यापाऱ्याला बसविण्याच्या आमिष दाखवणाऱ्या टोळीतील पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एकाला अटक केली, असून इतर सात जणांची नावे निष्पन्न केली आहेत. अर्धा किलो सोने अवघे तीन लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

समाधान गजानन काळे (रा. दहिगाव, नगर) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, काळे व इतरांनी फोनवरून पुण्यातील व्यापारी संभाजी शिवाजी इंदळकर यांच्याशी संपर्क साधला होता. सापडलेले अर्धा किलो सोने तीन लाखांत देतो, असे फोनवरून आरोपींनी इंदळकर यांना सांगितले. स्वस्तात सोन्याच्या अमिषाने इंदळकर १ नोव्हेंबर रोजी दुपारी सोने घेण्यासाठी नगर-सोलापूर रोडवर साकत गावाजवळ आले होते. इंदळकर स्वस्तात सोने घेण्यासाठी निर्जन ठिकाणी गेल्यानंतर आठ जणांनी त्यांना पकडून मारहाण केली. त्यांच्याकडील तीन लाख रुपयांची रोख रक्कम, मनगटी घड्याळ, मोबाइल, गॉगल, वॉलेट व इतर कागदपत्रे हिसकावून घेऊन दरोडेखोर पसार झाले.

स्वस्तात सोन्याच्या आमिषाने फसविले गेल्याचे इंदळकर यांच्या लक्षात आल्यानंतर नगर तालुका पोलिस स्टेशनला त्यांनी आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदविला. साकत या भागात सातत्याने या पद्धतीचे गुन्हे घडत असल्याने नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय़क पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी आरोपीचा शोध सुरू केला. नगर तालुक्यातील वाळकी गावाजवळ पोलिस आरोपींचा शोध घेत होते. त्या वेळी पोलिस बघून समाधन काळे पळून जात होता. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत लुटलेला मोबाइल, घड्याळ, पॅनकार्ड, मतदान कार्ड, एटीएम कार्ड मिळून आले.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या