पीएमपीत पुन्हा बांगडी चोरली…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील पीएमपीएलमधील चोर्‍यांचा धुमाकूळ सुरूच असून, पुन्हा एखदा ज्येष्ठ महिलेला लक्षकरून चोरट्यांनी त्यांच्या हातातील 20 हजार रुपयांची बांगडी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. विद्यापीठ बस स्टॉपसमोर हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 63 वर्षीय ज्येष्ठ महिलेने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पिंपळे सौदागर परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, त्या कामानिमित्त सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आल्या होत्या.

येथील काम संपल्यानंतर त्या विद्यापीठ बस स्टॉपवर पीएमपीची वाट पाहत थांबल्या होत्या. यावेळी चिंचवड ते वारजे बस आल्याने त्या परत जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील बांगडी चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.