जगात असे अनेक देश की ज्यांच्याकडे नाही कोणतही सेना, ‘अशा’ प्रकारे करतात आपल्या बॉर्डरची सुरक्षा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशातील सैन्य देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात. देशातील अंतर्गत सुरक्षा पोलिस हाताळत असतात तर देशाची बाह्य सुरक्षा सैन्य हाताळत असते. परंतु आज आपण अशा काही देशांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे स्वत:चे सैन्य नाही. होय, या देशांची जबाबदारी त्यांचे सैन्य सांभाळत नसून इतर देशांचे पोलिस व सैन्य सांभाळते.

व्हॅटिकन सिटी-

हा देश जगातील सर्वात लहान देश आहे, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे सैन्य नाही. काही वर्षांपूर्वी तेथे नोबल गार्ड असायचे. पण ही संस्था 1970 साली बंद पाडण्यात आली. सध्या या देशाची सुरक्षा इटालियन सैन्य करते.

मोनॅको-

मोनॅको हा एक छोटासा देश आहे. येथे 17 व्या शतकापासून कोणत्याही प्रकारचे सैन्य नाही. तथापि येथे लहान-लहान सैन्याच्या तुकड्या आहेत. या देशाला फ्रान्सचे सैन्य सुरक्षा प्रदान करते.

मॉरिशस-

1968 पासून मॉरिशस देशात कोणत्याही प्रकारचे सैन्य नाही. तथापि, तेथे 10,000 पोलिस कर्मचारी आहेत, जे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही सुरक्षा हाताळतात.

आईसलँड-

युरोपमधील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बेटात आईसलँड हा देश आहे. आईसलँड सौंदर्याच्या बाबतीत खूप चांगला देश आहे. सन 1869 पासून येथे कोणतेही सैन्य नाही. हा देश नाटोचा सदस्य आहे आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेकडे आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like