रस्त्यावर कार पार्क करणे ठरतेय धोक्याचं ! केवळ 10 मिनिटात काच फोडून चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावर काही वेळ कार पार्क करुन जाणे आता धोक्याचे ठरु लागले आहे. दोन दिवसांपूर्वी बालेवाडी येथे एकाचवेळी पाच ते सहा कारच्या काचा फोडून लाखोंचा ऐवज चोरुन नेण्याचा प्रकार घडला होता. आता म्हाळुंगे येथे केवळ १० मिनिटे कार पार्क केली असताना चोरट्याने कारची काच तोडून आतील दीड लाख रुपयांचे लॅपटॉप चोरुन नेले.

याप्रकरणी पुजा वसंत महाले (वय २९, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा महाले यांनी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी आपली होन्डा सीवीक कार म्हाळुंगे येथील न्याती एन्पोरिअल समोरील सर्व्हिस रोडवर पार्क केली व त्या ऑफीसमध्ये गेल्या. त्या १० मिनिटांनी परत आल्या. तेवढ्या वेळात चोरट्यांनी कारच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील दरवाजाची काच फोडून आतील दोन लॅपटॉप, रोख रक्कम असा १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

म्हाळुंगे येथील हा सर्व्हिस रोड वाहता असतो. सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर गर्दी असते. असे असताना चोरट्यांनी केवळ १० मिनिटात हात साफ केला. दोन दिवसांपूर्वी बालेवाडी येथे स्पर्धेसाठी आलेल्या लोकांनी आपल्या कार एकापाठोपाठ लावल्या होत्या. त्या सर्व गाड्यांच्या काचा फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. त्यामुळे रस्त्यावर गाड्या पार्क करणे धोकादायक ठरु लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like