’या’ 5 सवयीमुळे सकाळी उठल्या-उठल्या पोट साफ होत नाही, जाणून घ्या उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – सकाळी शौचास झाले नाही तर संपूर्ण दिवस खराब होतो. अनेकजण शौचास जातात पण पोट साफ होत नाही. अनेकजण पोट साफ होण्यासाठी विविध उपाय करत असतात. या समस्येला बद्धकोष्टता असे म्हटले जाते. आपल्याच काही चुकांमुळे हा समस्या होते. कोणत्या सवयी टाळल्या तर ही समस्या दूर होऊ शकते ते जाणून घेवूयात…

या सवयी टाळा

1 धुम्रपान
धुम्रपान केल्याने ही समस्या होते. यामुळे फुफ्फुसं खराब होणे, पचनशक्तीवरही परिणाम होणे, अशा समस्या होतात आणि पोट साफ होत नाही.

2 कमी पाणी पिणे
कमी पाणी प्यायल्याने सुद्धा ही समस्या होते. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करा. तणावमुक्त राहा.

3 नाश्ता न करणे
सकाळी नाश्ता न करणे हे देखील एक कारण आहे. यासाठी रोज सकाळी हेल्दी नाश्ता करा. गोड आणि बाहेरचे पदार्थ खाऊ नका.

4 जागरण करणे
जागरण किंवा उशीरा झोपल्याने ही समस्या होते. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. लवकर झोपा आणि लवकर उठा.

5 व्यायाम न करणं
व्यायामाच्या अभावाने शारिरीक हालचाल पुरेशी होत नाही. यामुळे पचनशक्ती मंदावते. यामुळे ही समस्या होते.