‘हिटमॅन’ रोहितसह ‘हे’ 5 फलंदाज T – 20 मध्ये करू शकतात ‘द्विशतक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंना द्विशतक झळकावले आहे. मात्र टी-20 मध्ये असा पराक्रम कुणालाही शक्य झाला नाही. मात्र अनेक खेळाडू या प्रकारात देखील द्विशतक झळकावु शकतात. आजच्या टी-20 च्या युगात  शतक झळकावणे कठीण असल्याने द्विशतकाच विचार देखील अवघड आहे. मात्र काही फलंदाज हि कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत.

आज आपण याच पाच खेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत

Image result for ख्रिस गेल

1) ख्रिस गेल
विंडीजचा धडाकेबाज फलंदाज आणि  युनिवर्सल बॉस ख्रिस गेल हा कारनामा करू शकतो. जगभरातील विविध क्रिकेट लीगमध्ये खेळणाऱ्या गेलने आतापर्यंत जवळपास 25 च्या वर शतके झळकावली आहेत. मात्र द्विशतक  झळकावण्यात त्याला यश आले नाही. आयपीएलमध्ये त्याने २०१३ मध्ये  एका सामन्यात 175 धावांची खेळी केली होती. मात्र त्यावेळी त्याला द्विशतक झळकावता आले नव्हते. मात्र तो क्रिकेटच्या या प्रकारात द्विशतक नक्कीच साजरे करू शकतो.

Image result for कॉलिन मुनरो

2) कॉलिन मुनरो

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज कॉलिन मुनरो हा देखील टी-20 प्रकारातील महत्वाचा फलंदाज आहे. त्याने न्यूझीलंडकडून खेळताना आतापर्यंत टी-20 सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत. त्यामुळे आक्रमक खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कॉलिन मुनरो हा देखील द्विशतक झळकावू शकतो.

Related image

3)अरॉन फिंच
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार अरॉन फिंच हादेखील या खेळाडूंमध्ये द्विशतक झळकावू शकतो. टी-20 प्रकारांमध्ये त्याने आतापर्यंत दोन धडाकेबाज खेळ्या केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 172 आहे.  झिम्बाम्वे विरोधात त्याने हि खेळी केली होती. तर इंग्लंडविरोधात त्याने 156 धावांची देखील खेळी केली होती. त्यामुळे तो देखील यामध्ये प्रबळ दावेदार आहे.

Image result for जोस बटलर
4) जॉस बटलर
इंग्लडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर हादेखील यामध्ये आघाडीवर असून तो आक्रमक खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सलामीला खेळणारा हा फलंदाज टी-20 मध्ये शतक झळकावण्यास सक्षम आहे. त्याच्यात आक्रमक खेळी करण्याची क्षमता असून आयपीएलमध्ये देखील तो सलामीला फलंदाजी करत आहे.

Related image
5) रोहित शर्मा
भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा याचे नाव देखील यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा या प्रकारात देखील द्विशतक झळकावू शकतो. तसेच आजच्या घडीला तो सर्वात यशस्वी सलामीवीर असल्याने त्याच्यासाठी हि कामगिरी फार मोठी नाही. आयपीएलमध्ये देखील मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने अनेक शानदार खेळ्या केल्या आहेत.