हडपसरमधील हॉटेल फोडून रोकड लंपास करणारा चोवीस तासात जाळ्यात

File Photo
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरातील पंजाबी हॉटेलचे शटर उचकटून ६२ हजार रुपयांचा ऐवज पळविणाऱ्याला हडपसर पोलीसांनी चोवीस तासाच्या आत गजाआड केले आहे. त्याच्याकडून ५२ हजार रोख व लॉकर असा ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनेश रामप्रकाश सिंग (२६, शिंदे वस्ती हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मगरपट्टा परिसरात प्रविण दलबिरसिंग चौहान यांचे पंजाबी  रसोई नावाचे रेस्टॉरंट  आहे. त्यांच्या रेस्टॉरंट त्यांनी १८ जानेवारी रोजी बंद करून ठेवले होते. त्यावेळी सकाळी नऊच्या आधी शटर उचकटून चोरट्याने  ५७ हजार रोख रक्कम व लॉकर असा ६२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलीसांनी तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिनेश सिंग याला अटक केली. त्याच्याकडून ५२ हजार रोख व लॉकर असा ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, हेमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी संपत औचरे, राजेश नवले, प्रमोद टिळेकर, राजू वेगरे, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, गणेश दळवी, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे व प्रविण ढोण इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

Total
0
Shares
Related Posts