काय सांगता ! होय, 1 वर्ष स्मार्ट फोन न वापरण्यासाठी ‘या’ मुलीला मिळणार तब्बल 72 लाख रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर स्मार्टफोनविना जीवन अवघड आहे,  असा विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही चुकीचे आहेत, कारण न्यूयॉर्कमधील 29 वर्षीय इलाना मुगडन हिने हे शक्य करून दाखवले आहे. तिने आपला 5 एस हा मोबाईल फोन तोडून स्क्रॉल फ्री फॉर वन ईयर चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना 1 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय मूल्यांत 72 लाख रुपये मिळणार आहेत.

या स्पर्धेचे आयोजन कोकाकोला ची कंपनी vitaminwater ने केले आहे. यामध्ये एक वर्ष तुम्हाला फोन वापरता येणार नाही. इलाना हिने 8 महिने पूर्ण केले असून त्यानंतर तिला एका लाय डिटेक्टर टेस्ट द्यावी लागणार असून त्यानंतर तिला बक्षीस दिले जाणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या स्पर्धेची सुरुवात झाली होती. यासाठी मुगडन हिला आपली नोकरी सोडावी लागली.

या स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या स्पर्धकांना लॅपटॉप, कॉम्प्युटर तसेच इंटरनेट वापरण्यास परवानगी होती. मात्र तिने या स्पर्धेंनंतर देखील आपण मोबाईलचा वापर करणार नसल्याचे म्हटले आहे. तिने याविषयी बोलताना संगीतले कि, मला नाही वाटतं मी यापुढे टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवू शकते. त्याचबरोबर या पुढे मी स्मार्टफोनचा वापर केला तर मी माझा वेळ वाया घालवणार आहे, त्यामुळे मी आता भविष्यात स्मार्टफोनचा वापर करणार नाही.

Visit : Policenama.com