‘हा’ व्यक्ती ‘किंग’ शाहरूख खानची ‘कार्बन कॉपी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत आज किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. फक्त देशातच नाही तर जगभरात आज शाहरुखचे चाहते आहेत. असे लाखो चाहते आहेत जे शाहरुखला कायम फॉलो करत असतात. अशीच शाहरुखची स्टाईल फॉलो करणारा आणि त्याच्यासारखा दिसणारा त्याचा एक चाहता चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या चाहत्याच्या लुकला घेऊन सोशलवर खूप चर्चा सुरू आहे.

शाहरुखची स्टाईल फॉलो करणारा हा चाहता सेम शाहरुखसारखा दिसत असल्याने सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा चाहता एक फोटोग्राफर आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या चाहत्याचे नाव अक्रम आहे. सोशलवर चर्चेत असणाऱ्या अक्रम सोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक स्थानिक वृत्तवाहिन्यांनी अक्रमच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. आपण बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसारखे दिसतो याचा अक्रमलाही विशेष आनंद आहे. किंग खानसारख्या दिसणाऱ्या या अक्रमचे अनेक फोटो समोर आले असून सध्या हे फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहेत. सूटाबुटातील अक्रमच्या एका फोटोत तर अक्रम अगदीच शाहरुख खानसारखा दिसतो. एकदम या फोटोवर नजर पडली तर हा अक्रम आहे हे ओळखणेही कठीण होते.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like