‘कोरोना’ झाल्याचा संशयावरुन मराठवाड्यात एकाच कुटुंबातल्या तिघांना काठीने मारहाण

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची दहशत आता गावपातळीवरही पोहचली आहे. कोरोना झाल्याच्या संशयावरुन मराठवाड्यात एकाच कुटुंबातल्या तिघांना काठीने बेदम मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पाचोड सोनवाडी खुर्द येथील एक तरुण सोनवाडी बुदृक येथील एका दुकानात किराणा सामान आणण्यासाठी गेले होते. दुकानांच्या बाहेर उभा असलेल्या एका सांगितले की तुम्हाला कोरोना झाला आहे असे म्हणून एकाच कुटुंबातील तीन जणांना लाठी काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. घटनेत तीन जण गंभीर जखमी आहे.

देशभर व संपूर्ण जगात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे. मुंबई व पुणे येथे बरेच रुग्ण कोरोनाचे आढळून आले आहेत. मुंबई पुणे येथे नोकरी करत असलेले व शिक्षण घेत असलेले गावाकडे परतू लागले आहे. सोनवाडी तालुका पैठण येथील तरुण एका कंपनीत नोकरी करत आहेत तो दहा मार्च रोजी गावाकडे आला होता.तो दुकानात किराणा माल घेण्यासाठी गेला होता. त्र्याचवेळी दुकानांच्या बाहेर त्याला काहींनी विचारले की तुला कोरोना झाला आहे आमच्या गावात का आलास असे म्हणून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने आपल्या भावाला व वडिलांना फोन करून सांगितले. त्यानंतर त्याचे आई वडील भाऊ व बहीण हे किराणा दुकानाजवळ आले होते. त्यानंतर तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केली आहे जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.