पाकिस्तानच्या विमानात एकाच वेळी तिघांना हार्ट ‘अ‍ॅटॅक’ ! एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमान प्रवास हा जलदशील आणि सुखकर समजला जातो. मात्र एका विमान प्रवासादरम्यान तीन व्यक्तींना ह्रदय विकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर दोन रुग्णांना रुग्णालयात हलवण्यात यश आले आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) च्या जेद्दाहहून इस्लामाबादला येणाऱ्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला.

पाकिस्तानी एका वृत्तानुसार, विमान प्रवासावेळी तीन प्रवाश्यांना अचानक छातीत दुखू लागले त्यामुळे विमानाचे कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पीआयएचं विमान पीके – 742 मध्ये सुमारे 225 यात्रेकरू प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान लँडिंग होण्यापूर्वीच महाला बीबी या महिला प्रवाश्याचा ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. विमान लँड होताच रुग्ण प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी नगर विमान प्राधिकरणची एक अॅम्ब्युलन्स डॉक्टर आणि मेडिकल स्टाफसह कराची विमानतळावर हजर होती. याद्वारे रुग्णांना दवाखान्यात हलवण्यात आले. इतर दोन रुग्ण सुखरूप असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Visit : policenama.com

Loading...
You might also like