सांगली : वाहनचालकांना अडवून लुटमारी करणाऱ्या तिघांना अटक

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

वळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथे एका दुचाकी स्वाराला अडवून जबरदस्तीने दुचाकी चोरून नेणाऱ्या तीन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बुधवारी (दि.२२) सकाळी इस्लामपूर येथे ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक मोबाईल असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुशांत निवास जाधव (वय -२६), मनोज मारूतीराव जाधव (वय -२३, दोघेही रा. पुणदीवाडी, ता. पलूस), सूरज गणेश कोरडे-बुरूड (वय-१९, रा. ताकारी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लुटमार करणारे तीन युवक इस्लामपूर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने इस्लामपुरातील एमआयडीसी रस्त्यावर सापळा लावला होता. तेथे तिघेही दोन मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिघांनी सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी १७ ऑगस्ट रोजी किल्ले मच्छिंद्रगड येथे एकाला अडवून त्याला मारहाण करून त्याची मोटारसायकल जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली. नंतर त्यांना अटक करून इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, संदीप पाटील, राहुल जाधव, सचिन कनप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
[amazon_link asins=’B071JWBFDT,B071NNLMDF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f12ffdc5-a5e8-11e8-a3d6-73c5bd53f2e8′]