आत्महत्येसाठी तब्बल 18 तास हॉटेलच्या छतावर चढला ‘हा’ टिकटॉक स्टार ! 50 लाख आहेत फोलोअर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या हरीनगर परिसरात रविवारी एक व्यक्ती हॉटेलच्या छतावर चढला आणि आत्महत्येची धमकी देऊ लागला. अरमान मलिक असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने छतावर गेल्यावर आपण आत्महत्या करणार असल्याचा व्हिडीओ काढला आणि तो टिकटॉवर शेअर केला आणि हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला त्यामुळे थोड्याच काळात अरमानचे फॉलोअर्सही खूप वाढले.

अरमान टिकटॉकवर खूप प्रसिद्ध आहे या आधीही त्याने सुसाईडच्या धमक्यांचे व्हिडीओ टाकले आहेत. एका सुसाईड धमकीच्या व्हिडिओत त्याने आपली पत्नी आणि तिच्या घरच्यांनी मिळून माझ्यावर बलात्काराचे आरोप केले असल्याचे म्हंटले आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अरमानने आत्महत्येचे एक पत्र टिकटॉक अकाउंटवर देखील टाकले होते. अरमानचे टिकटॉकवर ५० लाख फॉलोअर्स आहेत.

अरमानला हे टोकाचे पाउल त्याची पत्नी पायल आणि तीच्या दोन बहिणी यांच्यामुळे उचलायला लागले असल्याचे त्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार पायल अरमानची पहिली पत्नी आहे आणि याच हॉटेल मध्ये तिचे दुसरे लग्न झाले. अरमान आपल्या पत्नीसोबत अहमदाबादवरुन या हॉटेलमध्ये आला होता आणि अचानक दोघांमध्ये काहीतरी झाले आणि तो थेट हॉटेलच्या छतावर गेला. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अरमानला खाली उतरवले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like