TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून, बेडच्या आत मिळाला मृतदेह

सोनीपत : वृत्तसंस्था – TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यात घडली आहे. सोनीपत जिल्ह्यातील कुंडील भागात ही घटना घडली असून शिवानीचा मृतदेह बेडच्या आतमधे आढळून आला आहे. कुंडलीत राहणारा आरिफ याच्यावर खुनाचा आरोप करण्यात आला असून शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बेडमध्ये लपवून ठेवण्या आला होता. आरोपी आरिफ हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी सकाळी शिवानीच्या बहिणीच्या मित्राने बेड उघडला असता तिचा शिवानीचा मृतदेह आढळून आला. यानंतर कुटुंबीयांनी याचा माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

पोलिसांनी सांगितले की, शिवानी खोबियान येथील कुंडली भागात टच अँड फेअर नावाचे सलून चालवत आहे. टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. शिवानीची बहीण श्वेतानुसार 26 जून रोजी आरिफ तिच्या ब्युटी पार्लरमध्ये शिवानीला भेटण्यासाठी आला होता. ही गोष्ट शिवानीने श्वेताच्या फोनवर सांगितली. त्या रात्री शिवानी घरी परत आली नाही. तेव्हा रात्री श्वेताने मेसेज केला. मेसेजला शिवानीने ती हरिद्वारला आली आहे आणि मंगळवार पर्यंत येईल, असे उत्तर दिले.

या घटनेच्या दोन दिवसानंतर श्वेताचा मित्र नीरजने ब्युटी पार्लर उघडले असता त्याला दुर्गंधी येऊ लागली. नीरजने ब्युटी पार्लरमधील बेड उघडून पाहिले असता त्याला शिवानिचा मृतदेह आढळून आला. शिवानीचे वडील विनोद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरिफविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिव्हील रुग्णालयात पाठवला असून सोमवार (दि.29) रोजी शवविच्छेदन होणार आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असी माहिती पोलिसांनी दिली.