शेतपिकांच्या पंचनाम्याऐवजी आघाडी सरकारचा पंचनामा करण्याची वेळ : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी(सुधाकर बोराटे) –   चालु हंगामात पूणे जिल्ह्यात ६५ मीली.मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असुन नियमानूसार पूणे जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणुन जाहीर होणे गरजेचे आहे.परंतु आघाडी सरकार हे जनतेच्या कामापेक्षा अधिकार्‍यांवर दबावाचे राजकारण जास्त करत असल्याने नूकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप झाले नसल्याने शेतकर्‍यांच्या शेतपिकांचे पंचनामे करण्याऐवजी आघाडी सरकारचा पंचनामा करण्याची वेळ आली असल्याचे मत राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे निषेध मोर्चाला संबोधीत करताना व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार व लोकप्रतिनीधी यांचे विरोधात सोमवारी इंदापूर पंचायत समीती ते तहसिल कार्यालय निषेध मोर्चा काढण्यात ताला होता. त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते म्हणाले की राज्यातील कोरोनाची दहशत, पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटना, अवैद्य व बेकायदेशीर धंदे, इंदापूर तालुक्यातील रस्त्याची झालेली दुर्दशा, मराठा आरक्षण याबाबतीत महाविकास आघाडी सरकार यांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असून सर्वसामान्य जनता ,शेतकरी, कामगार, मजूर यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याने कुचकामी सरकारच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

राज्यातील तीन पक्षाच्या सरकारचे छापाईचे काम सध्या जोमात असुन अधिकार्‍यांच्या बदल्या हप्ते घेवुन करण्या येत असल्याचा घणाघाती आरोप हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी सरकारवर केला. राज्यात १५ जुन नंतर अधिकार्‍यांच्या बदलीचा कायदा नसतानाही सरकार कडुन अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने सर्वसामाण्यांच्या कामकाजाविषयी सरकार व लोकप्रतिनीधी निष्काळजी पणे वागत असुन आघाडी सरकार लवकरच कोसळेल असे भाकीत हर्षवर्धन पाटील यांनी केले.

मराठा आरक्षणाबाबतची चुकीची माहीती आघाडी सरकारने न्यायालयात सादर केल्याने मराठा आरक्षणास स्थगीती मीळाली असुन महीलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने राज्यात कायदा व सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.कर्नाटक,आंध्रप्रदेश, गुजरात, तामीळनाडु यासारख्या राज्यात कायदा लागु करण्यात येतो परंतु महाराष्ट्र सरकार मात्र हा कायदा लागु करत नसल्याने आघाडी सरकार झोपा काढतय की काय असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केला. तालुक्यातील रस्त्याची अवस्था फारच बीकट आहे. पुढे काम चालु तर मागे रस्त्याला खड्डे पडत असल्याने विकासाचा बट्याबोळ झाला आहे. लोकप्रतिनीधी कडुन ठेकेदारांना अभय मीळत असल्याने निकृृृृष्ट दर्जाची कामे होत आहेत.तर जवळच्या बगलबच्चांना कामे देवुन नागरीकांची दीशाभुल केली जात आहे.

तालुक्यातील अधिकार्‍यांवर दबावाचे राजकारण होत असुन लोकप्रतिनीधी पदाचा दुरुपयोग करत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.ते म्हणाले की विरोधी पक्ष म्हणुन भारतीय जनता पक्ष इंदापूर तालुक्यात वेळोवेळी भुमीका मांडणार असुन दबावाच्या राजकारणाला अधिकार्‍यांनी बळी पडु नये.आज आंदोलन तहसिलच्या गेटवर आहे, उद्याचे आंदोलण हे लोकप्रतिनीधींच्या घरावर करू असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शरद जामदार, मंगेश पाटील, इंदापूर कषि उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती मयुर पाटील,गटनेता कैलास कदम, सचिन आरडे, महेंद्र रेडके,रघुनाथ राऊत,पिंटु काळे,ललेंद्र शिंदे,मेघशाम पाटील, चाँद पठाण यांचूसह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थीत होते.