7 दिवसात कमी होईल पोट, ‘हे’ आहेत 11 ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणामुळे व्यक्तीमत्व बिघडते तसेच आजारांनाही आमंत्रण मिळते. कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी, हाय ब्लडप्रेशर असे अनेक गंभीर आजार हे लठ्ठपणामुळे होत असतात. वजन कमी करण्यासाठी काहीजन अनेक उपाय करतात. मात्र निराशाच पदरी पडते. कारण ते योग्य आहार घेत नाहीत. दररोज व्यायाम केल्यास तसेच योग्य प्रमाणात आहार घेतल्यास वजन कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यामुळे ७ दिवसात तुमचे वजन कमी होऊ शकते. जाणून घ्या उपाय…

हे उपाय करा.

1) पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घेऊन दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होण्यास मदत होईल.

2) वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर केला जातो. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

3) शरीरावराल चरबी कमी करण्यासाठी पपईचे सेवन करतात. पपईचे नियमित सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

4) दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

5) आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून त्याचे चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने वजन कमी होण्यास मदत होते.

6) चालण्यामुळेही पोट कमी होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी ४ किलोमीटर चालावे. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली करावी. रात्री ८:३० नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

7) परंपरागत मसाले वापरा. हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नका. तसेच जेवणात वरून मीठ घेऊ नये.

8) पांढरे पदार्थ म्हणजेच बटाटे, मैदा, साखर, तांदूळ कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ म्हणजेच डाळी, गहू, गाजर, पालक, सफरचंद, पपई आदी खाण्यावर जास्त भर द्या.

9) नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नका. दररोज वेगवेगळे पदार्थ खा.

10) सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या.

11) दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like