Petrol-Diesel Price : जाणून घ्या महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी (28 फेब्रुवारी) कोणतीही वाढ झाली नाही किंवा ते कमी झाले नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मागील दोन दिवसांपासून स्थिर आहेत. मागच्या एक आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत जास्त चढ-उतार दिसून आला नाही. दिल्लीत पेट्रोल 71.94 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत 77.60 रुपये प्रति लीटर, तर कोलकातामध्ये 74.58 रुपये प्रति लीटर आजही विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल 74.73 रुपये प्रति लीटर आहे.
डिझेलचे दरसुद्धा मागील दोन दिवसांपासून स्थिर आहेत. दिल्लीत डिझेल 64.65 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत डिझेल 67.75 रुपये आणि कोलकातामध्ये 66.97 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत डिझेल 68.27 रुपये प्रति लीटर आहे.
पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर
पुणे 77.84 – 66.86
अहमदनगर 77.69 – 66.69
औरंगाबाद 78.06 – 67.04
धुळे 77.55 – 66.56
कोल्हापूर 77.64 – 66.69
नाशिक 78.03 – 67.04
रायगड 77.25 – 66.26
रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.
एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.
कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249
2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222
3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122
वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता