Coronavirus : ‘कोरोना’च्या लढयात जगातील ‘या’ 11 दिग्गजांनी दिलं सर्वाधिक ‘एवढं’ दान, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरस संकटाला तोंड देत आहे. आतापर्यंत जगभरात 48 लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्याचबरोबर, विषाणूमुळे मृत्यूची संख्या तीन लाखांवर गेली आहे. वाढत्या विषाणूच्या धोक्याचा परिणाम सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेत दिसून आला आहे. यादरम्यान, काही लोक पुढे आले आहेत ज्यांनी या व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी त्यांच्या वतीने मोठे योगदान दिले आहे. जाणून घेऊया जगातील या 11 लोकांबद्दल …

जॅक डोर्सी
जॅक डोर्सी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कोरोना व्हायरस युद्धासाठी त्याने 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7500 कोटी रुपये) दान केले आहेत. दरम्यान, डोर्सी यांनी कोरोना व्हायरसने पीडित लोकांना मदत करण्यासाठी सुमारे 28 टक्के संपत्ती दिली आहे. ट्विटरवर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याची घोषणा केली.

बिल अँड मेलिंडा
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आहेत. फाउंडेशनने 255 मिलियन डॉलर्स (सुमारे 1800 कोटी रुपये) देणगी दिली आहे.

टाटा ट्रस्ट / टाटा सन्स
टाटा समूहाकडून 1500 कोटींची देणगी देण्यात आली आहे. देशातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टकडून 500 कोटींची घोषणा केली. याव्यतिरिक्त, टाटा सन्सकडून अतिरिक्त 1000 कोटी रुपये जाहीर केले. अशाप्रकारे, टाटा समूहाने कोरोनाशी लढण्यासाठी एकूण 1500 कोटी रुपये दान केले आहेत.

अँड्र्यू फॉरेस्ट
ऑस्ट्रेलियन अब्जाधीश अँड्र्यू फॉरेस्टने कोरोना विषाणूस 100 मिलियन डॉलर दान केले आहे.

अजीम प्रेमजी
आयटी क्षेत्रातील प्रमुख विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी 132 मिलियन डॉलरची देणगी दिली आहे. दरम्यान भारतकडून या लढ्यात अजीम प्रेमजींनी सर्वाधिक दान केले आहे.

जॉर्ज सोरोस
अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी 130 मिलियन डॉलर्सची देणगी दिली आहे.

जेफ बेझोस
अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी 100 मिलियन डॉलर दान केले आहे. बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. लॉकडाऊन असूनही, त्याची संपत्ती वाढली आहे.

मायकेल डेल
डेल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष मायकल डेल यांनी कोरोनाविरुद्ध युद्धासाठी 100 मिलियन डॉलर दान केले आहे.

जेफ्री स्कोल
स्कोल फाउंडेशनचे अध्यक्ष जेफ्री स्कॉल यांनी 100 मिलियन डॉलर दान केले आहे.

मायकेल ब्लूमबर्ग
मीडिया मोगुल आणि ब्लूमबर्गचे सह-संस्थापक मायकेल ब्लूमबर्ग यांनी 74.5 मिलियन डॉलर दान केले आहे.

लीन आणि स्टेसी
अमेरिकन परोपकारी लीन अँड स्टेसी यांनी 70 मिलियन डॉलर दान केले आहे.