जळगाव : बसला ट्रॅक्टरची धडक, अपघातात 12 जखमी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बस आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 12 जण जखमी झाले. त्यात बसचालकासह तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात संग्रामपूर येथील स्मशानभूमीजवळ शनिवारी सकाळी 7 वाजता घडला आहे.

याबाबत तामगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव आगाराची बस सोनाळा बुलढाणा वरवटकडून जळगावकडे येत होती. यावेळी संग्रामपूरकडून ट्रॅक्टर येत होता. अचानक समोरुन बस आल्याने ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. तरीही बसला जोरात धडक बसली. त्यात बसचा ड्रायव्हरच्या बाजूचा अर्ध्याहून अधिक पत्रा फाटला गेला. तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची हायड्रोलिक तुटल्याने ट्रॉली पूर्णपणे तुटून खाली पडली. या अपघातात बसचालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमधील 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/