TV अभिनेता कुशल पंजाबीची 37 व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील वांद्रे येथील घरात टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ३७ वर्षाच्या या हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याच्या या कृत्याने टीव्ही मालिका जगतात एकच खळबळ उडाली आहे. टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा याने टिट्वरवरुन ही दु:खद बातमी शेअर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

करणवीर आणि कुशल हे चांगले मित्र होते. आपल्या संदेशात करणवीर याने म्हटले आहे की, तुझ्या निधनाच्या बातमीने मला धक्का दिला. अजूनही मी त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. तु जेथे गेलास तेथे खुश असशील. फिटनेस आणि डॉन्स बाबत कुशल पंजाबी हा खूप लोकप्रिय होता.

कुशल याचा २३ एप्रिल १९८२ रोजी जन्म झाला होता. त्याने जोर का झटका हा टीव्ही रियाल्टी शो जिंकला होता. फेब्रुवारी २०११ पासून तो टीव्ही मालिकांमध्ये काम करीत होता. त्याने फरहान अख्तर याच्या लक्ष्य आणि करण जोहर याच्या काल या चित्रपटात काम केले होते. त्याशिवाय धन धना धन, गोल, ससस या चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच आसमानसे आगे, ऑन लाईफ ओके या मालिकांमध्ये त्याने काम केले होते. कुशल हा इश्क मे मरजांवा या मालिकेत दिसला होता.

त्याने एका युरोपियन तरुणीशी विवाह केला होता. त्यांना एक लहान मुलगाही आहे. त्याने कालच एक फोटो शेअर केला होता. गुरुवारी रात्री वांद्रे येथील आपल्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कुशल पंजाबी याने युरोपियन मैत्रिण ओद्रे डॉलहन हिच्याशी २०१५ मध्ये विवाह केला होता. त्याला कियान हा तीन वर्षाचा मुलगा आहे. मृत्यु पूर्वी त्याने आपला मुलगा कियांन याचा फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला होता. कुशल पंजाबी याने वांद्रे येथील आलसीद बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घरातील फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी रात्री ११ वाजता आढळून आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/