माणिकबागेतील तरुणीच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे बंद फ्लॅट असलेल्या सापडलेल्या तरुणीच्या खुन प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. वसंतकुमार गौडा (मुळ रा़ बंगळुरु) आणि पियुष नितीन संचेती (रा़ सहकारनगर) अशी या दोन मित्रांची नावे आहेत. 

सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात सोमवारी तेजसा पायाळ (वय २९) या तरुणीचा राहत्या घरी मृत्यदेह आढळून आला होता. पियुष संचेती हा या तरुणीचा मित्र आहे. हे दोघे फ्लॅटला कुलूप लावून पळून गेले होते. काल त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.
तेजसा हिच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तसेच घरात दारुच्या बाटल्या, हुक्का आदि सामुग्री आढळून आली होती.

तेजसा मोबाईल उचलत नसल्याने तिची आई गावावरुन आली व तिचे फ्लॅटचे कुलूप उघडले तर तेजसा हिचा मृतदेह घरात आढळून आला होता. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.