लहान मित्रांनंच केला घात, कारमध्येच 51 वर्षाच्या दोस्ताचा आवळला बेल्टनं गळा

रांजणगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील शिरूर मधील रांजणगाव येथे ५१ वर्षीय दादासाहेब भाऊसाहेब नवले यांची दोन लहान मित्रांनी गळा दाबून हत्या केली आहे. १० मार्च रोजी संध्याकाळी पावणे सातच्या दरम्यान विनोद जाधव (वय-१९) आणि सुनील जाधव (वय-१९) यांनी अल्टो गाडीमधून नवले यांचे अपहरण केले. गाडीमध्ये नवले यांना तरुणांनी जबर मारहाण केली आणि कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून दादासाहेब नवले यांची हत्या करून, त्यांचा मृतदेश शिरूर मधील घोड नदीपात्रात फेकून दिला.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता तिघे जण दारू पिऊन एकत्रपणे घरी जात असताना, गाडीमध्ये दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला व शाब्दिक चकमक झाली आणि रागाच्या भरात आरोपींनी कंबरेच्या बेल्टने दादासाहेब नवले यांची गळा आवळून हत्या केली. ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे तिघेही एका गाडीतून जात असल्याचे दिसत होते, त्या आधारवर पोलिसांनी आरोपीना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

आरोपींनी पहिल्यांदा गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ केली पण, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. दोन्ही आरोपींनी नवले यांचा खून का आणि कशासाठी केला, याची नेमकी माहिती अद्याप मिळू शकली नाही, या प्रकरणी रांजणगाव पोलीस अधिक तपास करत आहे.