दोन हजारांच्या २९ बनावट नोटा वटविणार्‍या दोघांना पकडले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील बसस्थानकाजवळील दुकानात बनावट नोटा वटविणारे प्रेमविष्णू रोगा राफा (२६, काटेमानेवली, कल्याण) आणि नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, आनंदवाडी, कल्याण) या दोघांना कल्याण येथून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन हजारच्या आणखी २९ बनावट नोटा, ३ मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी राज राजकुमार उज्जेनलाल सिंह (वय २८, कल्याण, ठाणे) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

२ नागरिकांना लाच देताना पकडून देणाराच तलाठी एसीबीच्या जाळ्यात

सांगली शहरातील बसस्थानकजवळील एका दुकानात खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर या दोघांनी दोन हजाराची बनावट नोट दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य तिघे पसार झाले होते. मित्रांनी मला फसवले आहे, एवढेच राज सिंह हा चौकशीत सांगत असल्याने त्याच्या तीन साथीदारांच्या मागावर उपनिरीक्षक गणेश शिंदे यांचे पथक तपासासाठी कल्याण (ईस्ट) ला गेले होते.या पथकाने प्रेमविष्णू राफा आणि नरेंद्र ठाकूर यांना कल्याणमधून अटक केली. मात्र, टोळीतील चौथा साथीदार मनिष अजूनही फरार आहे. दोघांनाही न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधीक्षक सुहेल शर्मा, उपाधीक्षक अशोक विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस हवालदार बिरोबा नरळे, नाईक सुशांत ठोंबरे, दिनकर चव्हाण यांनी कारवाई केली. बनावट नोटा चलनात आणणार्‍या या टोळीचा सखोल तपास केला जात असल्याचे उपनिरीक्षक शिंदे यांनी सांगितले. या टोळीतील सिंह हा मोलमजुरी, राफा खासगी नोकरी, तर ठाकूर हमाली करतो. तिघांचीही एकमेकांशी तोंड ओळख आहे. या टोळीचा म्होरक्या वेगळाच कोणी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

कल्याणमध्ये आरोपींच्या मागावर गेलेले पोलीस पथक राफाच्या घरी गेले मात्र तो घरी नव्हता. तो रखेलीसोबत विजापूर येथे गेल्याचे पथकाला समजल्यानंतर पथकाने विजापुरात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. राफाची रखेल ही मूळची बांग्लादेशची आहे. तिच्या माध्यमातूनच राफा बनावट नोटा आणत असल्याचा संशय पोलिसांना आहे.