‘उबर’ कॅब चालकाला ‘ड्रायव्हिंग’ करताना रस्त्यातच आली ‘झोप’, 28 वर्षीय प्रवाशी महिलेनं ‘मुंबई-पुणे’ दरम्यान 150 km स्वतः चालवली कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात एका महिला प्रवाशाला स्वतः उबर कार चालवावी लागली. खरं तर, पुण्यापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर मुंबईला जाणार्‍या महिलेने उबर कॅब बुक केली होती. त्याचा चालक वाटेतच झोप लागली. बळजबरीने महिलेने स्वत: स्टीयरिंग ताब्यात घेतले आणि गाडी मुंबईकडे वळविली. ही घटना 21 फेब्रुवारी रोजीची आहे. पण जेव्हा 28 वर्षांच्या तेजस्विनी दिव्या नाईक यांनी सोशल मीडियावर घटनेचे फोटो-व्हिडिओ शेअर केले तेव्हा ही घटना उघडकीस आली. तेजस्विनी यांनी व्हिडिओद्वारे उबर कंपनीकडे ड्रायव्हरची तक्रार देखील केली.

याबाबत बोलताना तेजस्विनी म्हणाल्या की, ‘मी पुण्याहून अंधेरी (मुंबई) येथे जाण्यासाठी उबर कॅब बुक केली होती. सुरुवातीला ड्रायव्हर सतत फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलण्यापासून रोखलं. जेव्हा त्याने फोन ठेवला त्यानंतर त्याला झोप येऊ लागली. एकदा तर अपघात होता होता वाचला. मी ड्रायव्हरला सांगितले की त्याला जर झोपायचे असेल तर मी थोडावेळ गाडी चालवते. आधी त्याने नकार दिला पण नंतर मी स्टिअरिंग ताब्यात घेतले.

तक्रारीवरून चालक निलंबित, कंपनीने देखील माफी मागितली

तेजस्विनी यांनी सांगितले की, “अर्धा तास शिल्लक असताना ड्रायव्हर उठला आणि गाडी चालवू लागला. जेव्हा मी उबरकडे तक्रार केली, तेव्हा मला ईमेल वरून उत्तर मिळाले की ड्रायव्हरला कंपनीतून निलंबित केले गेले आहे. उबरनेही या घटनेबद्दल दु: ख व्यक्त करीत माफी मागितली आहे. ”तेजस्विनीच्या म्हणण्यानुसार, तिने पुरावा म्हणून ड्रायव्हरचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढले होते. तेजस्विनी एक लेखक असून चित्रपटांसाठी कथा लिहितात.