भाजपकडून उदयनराजेंच्या पुनर्वसनाची तयारी सुरू, केंद्रात मंत्रिपद मिळणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा पोटनिवडणुकीत सातारा मतदार संघातून उदयनराजे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर आता भाजपने उदयनराजेंच्या पुनर्वसनाची तयारी सूरु केली आहे. भाजपकडून उदयनराजेंना थेट मंत्रिपदाची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उदयनराजे भोसले यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, पक्षसंघटना त्यांची योग्य ती काळजी घेईल, अशीमाहिती काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. आता उदयनराजेंना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना आता थेट मंत्रिपदाची ऑफर दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

उदयनराजे हे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सातारा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर मात्र अवघ्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं तिथं पोटनिवडणूक जाहीर झाली. विधानसभेच्या निवडणुकीसोबतच ही निवडणूक झाली. राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील हे रिंगणात होते. या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 87 हजार मतांनी दणदणीत पराभव झाला होता.

Visit : Policenama.com