‘फडणवीस-पाटील ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी डाव’ टाकल्याशिवाय राहणार नाही’

ADV

अकोला, ता. ८ : पोलीसनामा ऑनलाइन : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी amol mitkari यांनी मुख्यमंत्री ठाकरे व पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या अनुषंगानं एक ट्वीट केलं आहे. ‘महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांची भेट घेत असल्यानं चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, कमालीची अस्वस्थ झालेली पाटील-फडणवीस Fadnavis ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशी मिटकरी amol mitkari यांनी एक शंका देखील उपस्थित केली आहे.

 

ADV

 

मराठा आरक्षणासह राज्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आपल्या शंकेला आधार म्हणून मिटकरी यांनी दुसरं ट्वीट केलं आहे.

त्यातून त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याकडं लक्ष वेधलं आहे.

‘मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या बैठकीला सुरुवात होण्याआधीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले आहेत.

याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप हा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष झालाय.

बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा त्यांच्याकडं दुसरं काही शिल्लक नाही,’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Also Read This : 

 

ऑयली त्वचेसाठी काळ्या हरभर्‍यापासून बनलेला फेस मास्क सर्वोत्तम, स्किन मऊ देखील होईल, जाणून घ्या बनवण्याची प्रक्रिया

 

दिल्लीत उद्धव-मोदींमध्ये खलबतं, राज्यात भाजपने बोलवली तातडीची बैठक, फडणवीस यांच्या बंगल्यावर हालचालींना वेग

 

फक्त एक महिना दररोज ‘या’ भाजीचं करा सेवन, हैराण करतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

 

‘चोरीचा माल विकत घेणं सुद्धा गुन्हा’ ! अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांनी दिलं उत्तर

ब्यूटी ट्रेंडमध्ये सर्वत्र दिसतोय लिप मास्क, जाणून घ्या त्याचे फायदे अन् घरच्या घरी बनवण्याची पध्दत

 

खासदार नवनीत राणांना मोठा झटका, मुंबई HC कडून जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात

 

Hasan Mushrif | ‘राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत अन् आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करणार’