पाहा : RSS च्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर ‘गोळीबार’, पोलिसांकडून कारवाईचा इशारा (व्हिडिओ)

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – दरवर्षी विजया दशमीच्या दिवशी काही ना काही कार्यक्रमाने राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) काही ना काही कारणाने चर्चेत असते. मागील वर्षी संचलनात तलवारी वापरल्याचे मोठी चर्चा झाली होती. आज देखील दसऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशच्या सीतापुरमध्ये जोरदार हवाई गोळीबार केला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली जिच्यामध्ये दसरा उत्सवाच्या निमित्ताने आरएसएसच्या सदस्यांनी हवेत रायफलद्वारे गोळीबार केला. या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलिस कारवाईसाठी आले आणि त्यांनी चौकशी सुरु केली.

योग्य कारवाई करणार : पोलिस
सीतापूरचे सहायक पोलिस अधीक्षक मधुबन प्रताप सिंह यांनी या गोळीबारात जबाबदार असणाऱ्यांची चौकशी आणि दोषी आढळल्यानंतर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यांनी म्हटले, ‘सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्याद्वारे आम्हाला आरएसएसच्या एका कार्यक्रमात गोळीबार केल्याच्या घटनेची माहिती मिळाली. आम्ही आरोपींची ओळख पटवित आहोत आणि योग्य कारवाई केली जाईल.’

दरम्यान दरवर्षी संघाचे (RSS) सदस्य शस्त्रांची पूजा करतात. यावेळी, त्यांची शस्त्रे आणि तलवारीची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. संघ प्रमुख मोहन भागवतही अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेतात.

सीतापूर वाढत्या व्हायरल होण्याच्या या व्हिडिओमध्ये आरएसएसचे कार्यकर्ते उघडपणे गोळीबार करताना दिसत आहेत. यात आरएसएसचा पोशाख घातलेला एक व्यक्ती रायफलमधून गोळीबार करताना दिसत आहे, तर दुसरा सदस्य रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करताना दिसत आहे. हा गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीतापूरच्या एएसपीने या प्रकरणाची दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले.

Visit : Policenama.com