भारताचं UPI झालं आणखी ‘शक्तिमान’, आता संपुर्ण जगात कोठेही पैसे ट्रान्सफर करता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये लोक ऑनलाइन पेमेंटसाठी सर्वात जास्त यूपीआयचा वापर करतात. कारण यूपीआयच्या प्लॅटफॉर्मला पैसे ट्रांसफरसाठी सुरक्षित मानले जाते. यूपीआयचे यूजर्स लवकरच देशाच्या बाहेर ऑनलाइन पेमेंट करु शकतील. परदेशात यात्रा करणारे प्रवाशांना यूपीआय आयडी मिळेल, ज्याने ते सहज पेमेंट करु शकतील. परंतू याबाबतची माहिती बँकर्सकडून कळवण्यात आली आहे, सरकारकडून यावर आधिकृत माहिती दिलेली नाही.

या देशात करु शकाल पेमेंट –
आता यूपीआय यूजर्स यूएस आणि सिंगापूरमध्ये ऑनलाइन पेमेंट करु शकतात. याआधी लोकांसाठी देशात RuPay कार्ड उपलब्ध करुन दिले होते, एनपीसीआयच्या या सेवेबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. तर भारतात पेमेंट कार्डला यूपीआयकडून टक्कर देण्यात आली आहे. तसेच अनेक व्यवसायिक यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट घेत आहेत. सप्टेंबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून 95.5 कोटी रुपयांचे व्यवहार होतात.

यूपीआय कसे करते काम –
यूपीआय इंटरनेट बँक फंड ट्रांसफरच्या मॅकेनिजमवर आधारित आहे. एनपीसीआयच्या माध्यमातून ही सिस्टम नियंत्रित केली जाते. यूजर्स यूपीआयमधून काही मिनिटात घरी बसून पेमेंट बरोबरच मनी ट्रांसफर करु शकतात.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा