‘वेटलिफ्टिंग’ला प्रवेश घेताना बनावट कागदपत्रे सादर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बालेवाडी येथील क्रीडा संकुल मधील वेटलिफ्टिंग खेळासाठी प्रवेश घेताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 जून ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत घडली.

याप्रकरणी सोमनाथ जगन्नाथ ढाकणे (50, रा. रहाटणी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अनिकेत मुकुंदराव देशमुख (रा. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून ते 17 ऑक्टोबर 2019 या कालावधीत बालेवाडी क्रीडा संकुल येथे कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया पार पडल्या.

या प्रक्रियेद्वारे वेटलिफ्टिंग खेळामध्ये क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बालेवाडी क्रीडा संकुल येथे प्रवेश घेण्यासाठी आरोपी अनिकेत याने त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, डोमासाईल प्रमाणपत्र, जन्मदाखला ही बनावट कागदपत्रे सादर केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रीडा संकुल प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक केली आहे. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com