आता योगी सरकारनं बदललं ‘या’ नदीचं नाव !

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मोठे पाऊल उचलत राज्यात पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीसह विविध प्रस्तावांना मंजुरी दिली. योगींच्या मंत्रिमंडळाने राज्यातील प्रमुख घागरा नदीचं नाव बदलले आहे. या नदीचे नाव बदलून ‘सरयू’ असे ठेवण्यात आले आहे. आता इथून पुढे घागरा नदी ‘सरयू’ या नव्या नावाने ओळखली जाणार आहे.

ही शरयू नदी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. अयोध्या नगरी याच नदीच्या तीरावर वसली आहे ,त्यामुळे तिला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आता राज्य मंत्रिमंडळानं या नदीचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता महसूल विभागात सरयू नावानं या नदीची नोंद करण्यात येईल. घागराच्या नावात बदल करण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी योगी सरकारच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर घागरा ही सरयू नावानं ओळखली जाईल.

ही नदी नेपाळपासून बहराइचमार्गे गोंडापर्यंत या नदीला घागरा नावाने ओळखली जाते. गोंडाच्या पुढे या नदीला सरयू नावानं ओळखलं जातं. योगी आदित्यनाथ सरकारनं आता या नदीला सरयू नाव दिलं आहे. ही नदी दक्षिण तिबेटच्या उंच पर्वतरांगेत मापचाचुंगो हिमनदीतून उगम पावते आणि उत्तर प्रदेशात बहराइच, सीतापूर, गोंडा, बाराबंकी, अयोध्या, आंबेडकरनगर, मऊ, बस्ती, गोरखपूर, लखीमपूर खिरी आणि बलिया अशी वाहते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like