‘वंचित’चे बीड जिल्ह्यातील उमेदवार जाहीर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन विकास आघाडीने आज आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यात बीडमधून अशोक हिंगे (मराठा), माजलगावमधून रविकांत अंबादास राठोड (बंजारा), आष्टीतून नामदेव सुग्रीव सानप (वंजारा), केजमधून अजिंक्य चांदणे (मातंग), परळीतून भीमराव सातपुते (धनगर), तर गेवराईमधून विष्णू भगवान देवकते (धनगर) अशी उमेदवारांची नावे आहेत.

Visit : policenama.com