जेव्हा अभिनेत्री वर्षा उसगावाकरनं केलं होतं ‘TOPLESS’ फोटोशुट, झाली होती प्रचंड टीका ! (फोटो)

ADV

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री वर्षा उसगावकर हिनं 90 च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जीवावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वयाची पन्नाशी पार केलेली वर्षा आजही तेवढीच सुंदर दिसते. आज आपण वर्षाचा तो किस्सा जाणून घेणार आहोत जेव्हा तिच्या टॉपलेस फोटोशुटनं खळबळ उडाली होती.

ADV

मराठी आणि हिंदी सिनेमात काम करून नाव कमावल्यांतर वर्षानं एका इंग्रजी मासिकासाठी टॉपलेस फोटोशुट केलं होतं ज्यामुळं ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या फोटोशुटमुळं अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. चाहत्यांना तिचं हे शुट अजिबात आवडलं नव्हतं. अनेकांनी तिच्यावर निशाणा साधत टीका केली होती.

वर्षाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं गंमत जमत, हमाल दे धमाल, लपंडाव, भुताचा भाऊ, अशा अनेक सुपरहिट मराठी सिनेमात काम केलं आहे. इतकंच नाही तर हिंदी सिनेमातही तिनं आपली ओळख तयार केली आहे. परवाने, तिरंगा, हस्ती, दूध का कर्ज, घर आया मेरा परदेशी असे काही तिचे तिचे हिंदी सिनेमे सांगता येतील. याशिवाय महाभारत, चंद्रकांता अशा लोकप्रिय मालिकेतही तिनं भूमिका साकारल्या आहेत.