वरुण धवन-ऋचा चड्ढाच्या लग्नासाठी ‘ग्रहण’ बनला ‘कोरोना’ व्हायरस, वेडिंग डेट्स पोस्टपॉन !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोनाच्या भीतीनं लोकांचं घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. अनेकांचे लग्नही पोस्टपॉन झाले आहे. बॉलिवू़ड स्टार्सही याला अपवाद नाहीत. अलीकडेच याबाबत माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल तसेच अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री ऋचा चड्ढा यांनीही आपल्या लग्नाच्या डेट्स पुढे ढकलल्या आहेत. वरुणनं लग्नाची तारीख 2020 च्या सेकंड हाफमध्ये शिफ्ट केली आहे. अशी माहिती आहे की वरुण आणि नताशाचं लग्न थायलंडमध्ये प्लॅन करण्यात आलं होतं. यानंतर हे जोधपूरला शिफ्ट करण्यात आलं. यानंतर मुंबईत साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यांच सांगण्यात येत आहे.

सध्या मात्र लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. वरुण आणि नताशा यांचं लग्न आता नोव्हेंबरमध्ये थायलंडमध्ये होण्याची शक्यता आहे. अली आणि ऋचा यांनी अलीकडेच लग्नाची घोषणा केली होती. त्यांच्या लग्नासाठी अनेक गेस्ट युएस आणि युरोपमधून येणार होते. परंतु आता मात्र ते शक्य नाही. कोरोनामुळं त्यांनी लग्न टाळल्याचं सांगितलं जात आहे. वरूण आणि ऋचा यांच्या लग्न टाळण्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दोन्ही कपलकडून आलेली नाही.

https://www.instagram.com/p/B6xTGtTF48N/