वाहन चोरट्याला संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वानवडी भागातील जांभुळकर चौकात संशयास्पद रित्या उभ्या असलेल्या तरुणाच्या चौकशीत तो वाहन चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने त्याला अटक केली असून त्याच्याकडील मोटारसायकल जप्त केली आहे.

संजय ओमदास भोसले (वय४५, रा़ शिंदे छत्री, वानवडी)असे त्याचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]

याबाबत पोलिसांनी सांगितले की, संघटीत गुन्हेगारी विरोधी पथक पूर्व विभागाचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व त्यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक जी जी पवार, सहायक फौजदार सोनवणे, मेंगे, सुमित ताकपेरे, शिंदे हे वानवडी, कोंढवापरिसरात गस्त घालत होते़ त्यावेळी पोलीस शिपाई ताकपेरे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की, जांभुळकर चौकात हिरवा टी शर्ट घालून एक तरुण उभा असून त्याच्याकडील हिरोहोंडा मोटारसायकल चोरीची असल्याचा संशय आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e62605c-c60e-11e8-9517-6343bfd40a60′]

या बातमीनुसार पोलिसांनी सोमवारी रात्री साडेसात वाजता जांभुळकर चौकात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार तेथे एक तरुण उभा होता. त्याचा घेराव करुन पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपले नाव संजय भोसले असल्याचे सांगितले. मात्र, मोटारसायकलविषयी  व कागदपत्राची विचारणा करता  तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा त्याच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वानवडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.