मधुमेह असताना देखील 71 वर्षीय व्यंकय्या नायडूंनी कशी जिंकली ‘कोरोना’ची लढाई ? सांगितलं गुपित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. देशातील सामान्य नागरिकांबरोबरच अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामधून अनेकजण आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बाहेर देखील पडले आहेत. यामधीलच भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील आहेत. त्यांनी देखील कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर एक फेसबुक पोस्ट लिहीत आपल्या यशस्वी आरोग्याचे रहस्य सांगितले आहे.फिजिकल फिटनेस, मेंटल एक्सरसाईज आणि खाण्यात देशी गोष्टींचा वापर केल्यास आपण या इंफेक्शनविरोधातील लढाई जिंकू, असा अपल्याला विश्वास होता, असे नायडू यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये त्यांनी आपण फिट कसे काय राहतो याचे देखील रहस्य सांगितले आहे.

या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘मला विश्वास आहे, की माझे वय आणि मधुमेहासारख्या काही व्यैद्यकीय समस्या असतानाही, मी फिजिकल फिटनेस, मानसिक तप, योग आणि वॉकिंग सारख्या रेग्युलर एक्सरसाईजमुळे कोरोनाची लढाई जिंकू शकलो. या शिवाय मी केवळ देशी खाद्य पदार्थच घेत होतो. आपल्या सेल्फ आयसोलेशन काळात मी याच गोष्टी केल्या.त्याचबरोबर त्यांनी या पोस्टमध्ये नागरिकांना वॉकिंग, जॉगिंग अथवा योग यांसारखा नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.आहाराविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘डायटमध्ये प्रथीनयुक्त पदार्थ खाणे आणि जंक फूड पूर्णपणे टाळणे हेही महत्वाचे आहे. याशिवाय, आपल्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेणे, मास्क लावणे, नेहमी-नेहमी हात धुणे, नेहमी स्वच्छतेची काळजी घेणे आदी प्रोटोकॉल्स कठोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे.’त्याचबरोबर आपल्या होम क्वारनटीन काळातील दररोजच्या कामाविषयी त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की,, न्यूज पेपर, मॅगझीन आणि आर्टिकल वाचत असल्याने त्यांचा दिवस अत्यंत चांगला गेला.

‘या काळात मी स्वतंत्रता आंदोलनाच्या संदर्भातीलही अनेक गोष्टींचे अध्ययन केले. मी दर आठवड्याला दोन फेसबुक पोस्टदेखील लिहीत आहे. यात स्वातंत्र्य संग्रामातील काही अनोळखी शूरवीरांच्या बलिदानांचे आणि शौर्याचे किस्से आहेत. त्यामुळे या काळात मला कोणताही त्रास जाणवला नाही. नायडूंना 29 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सोमवारी 12 ऑक्टोबरला RT-PCR टेस्टनंतर त्यांनी स्वतःच आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे केवळ २ आठवड्यातच चांगला आहार आणि दैनंदिन व्यायामाँमुळं कोरोनातून बाहेर पडल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.