सोशल मीडियाद्वारे मतदारांशी संपर्क करण्यास उमेदवारांची पसंती

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुका पंधरा दिवसापूर्वी येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत अर्जाची वैधता पूर्ण झाल्यानंतर आलेल्या पहिल्या रविवारच्या सुट्टीचा उपयोग उमेदवारांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते व मतदारांच्या संपर्कासाठी केला. प्रत्यक्ष भेटीगाठीबरोबरच त्यांना फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न करीत होते.

राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. सोशल नेटवर्किंग साइटपैकी व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ट्विटरवरवर सर्वात जास्त प्रचार होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताच ती क्षणात सर्वत्र व्हायरल होते. कमी वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मतदारांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस, बल्क मेसेजेस पाठवून आपण कसे सक्षम उमेदवार आहोत, याचा दाखला दिला जात आहे. काही इच्छुकांनी तर आपल्या कार्यकर्तृत्वाचे व्हिडीओच तयार करून मतदारांना पाठविण्यासह शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.

Visit : Policenama.com