आदर्श शिक्षिका विद्या म्हेत्रे यांना समता सेवा गौरव पुरस्कार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील जेजुरी, कुंभारकरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श शिक्षिका तसेच जेजुरी येथील म्हाळसादेवी मंडळाच्या कार्याध्यक्ष विद्या महेश म्हेत्रे यांना जिल्हा समता कृती प्रतिष्ठानच्या वतीने समता सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . पुणे जिल्हा समता कृती प्रतिष्ठानच्या वतीने कुंभारवळण येथील ममता बाल सदन येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी विद्या म्हेत्रे यांना समता सेवा गौरव पुरस्काराने पुणे जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . यावेळी प्रतिष्ठानचे प्रमुख दिगंबर कदम, अध्यक्ष अ‍ॅड . राहुल कदम, सर्व पदाधिकारी, जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, सुनील लोणकर, संदीप जगताप, गोविंद लाखे आदी उपस्थित होते .

विद्या म्हेत्रे यांनी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. म्हाळसादेवी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी आरोग्य शिबिरे, महिला सबलीकरण, महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जेजुरी जत्रा आदी उपक्रम राबविले आहेत. या पुरस्काराबद्दल जेजुरी लघुउद्योग संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, जेजुरी देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राऊत, केबीसी स्पोर्ट्स क्लब, म्हाळसादेवी महिला मंडळ, मार्तंड मित्र मंडळ, प्राथमिक शिक्षक संघटना आदी संघटनांच्या वतीने विद्या म्हेत्रे यांचे अभिनंदन करण्यात आले.

Visit : Policenama.com