विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांचा पराभव, राष्ट्रवादीचे निलेश लंके विजयी

पारनेर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे. 59,838 घवघवीत मताधिक्याने लंके यांना यश मिळाले आहे.

विजय औटी यांना 80,125 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे निलेश लंके यांना 1,39,963 मते मिळाली आहेत. तर नोटाला 1,479 मते मिळाली आहेत.

पारनेर विधानसभा मतदारसंघ
1. निलेश लंके ( राष्ट्रवादी काँग्रेस ) – 1,39,963 मते, विजयी झालेले उमेदवार
2. विजय औटी ( शिवसेना ) – 80,125 मते
3. जितेंद्र साठे (बहुजन समाज पार्टी ) – 1019 मते
4. प्रसाद खामकर (जनता पार्टी ) – 961 मते
5. इंजि. डी.आर शेंडगे ( वंचित बहुजन अघाडी ) – 2499 मते

Visit : Policenama.com