साऊथचा ‘हा’ सुपरस्टार साकारणार मुथैया मुरलीधरनची भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवुडमध्ये सध्या बायोपिकचा सीजन सुरु आहे. अनेक खेळाडू अणि महान व्यक्तींच्या जीवनावर आतापर्यंत बायोपिक बनवण्यात आले आहेत. अनेक दिग्दर्शक देखील मोठ्या प्रमाणात बायोपिक बनवण्यावर भर देत आहेत. सध्या रणवीर सिंग कपिल यांच्या जीवनावर बनणाऱ्या बायोपिकमध्ये काम करत आहे तर तापसी पन्नू एकीकडे भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राजवर बायोपिक करत आहे. त्यानंतर आता श्रीलंकेचा महान स्पिनर मुथैया मुरलीधरनच्या याच्या जीवनावर बायोपिक बनवण्यात येणार आहे.

तामिळ सिनेमातील सुपरस्टार विजय सेतुपती मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे. विजय सेतुपतीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे.त्याने लिहिले की, मी या शानदार प्रोजेक्टचा भाग होऊन स्वत:ला नशीबवान समजतो आहे. या बायोपिकबाबत लवकरच अधिकृत अपडेट्स समोर येतील. या सिनेमाचं नाव ‘८००’ असणार आहे. मुरलीने आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० विकेट घेतल्याने त्याच्या या सिनेमाचं नाव हे ठेवल्याच सांगण्यात येत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा एक वर्ल्ड रेकॉर्ड असून या रेकॉर्डच्या आसपास ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न होता.त्याने टेस्टमध्ये ७०८ विकेट घेतल्या आहेत.

या सिनेमाचं दिग्दर्शन M S Sripathy करणार असून इतर कलाकारांची घोषणा देखील लवकरच करण्यात येणार आहे. या चित्रपटाविषयी आधिक बोलताना विजय म्हणाला कि,, ‘मी मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकशी जोडला गेल्याने आनंदी आहे. तो तमिळ ओरिजनचा आयकॉनिक स्पोर्ट्समन आहे. मुलरीधरनची भूमिका साकारणं माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल आणि मी ही भूमिका साकरण्याची वाट बघत आहे’.त्याचबरोबर विजय यासाठी मुरलीकडून प्रशिक्षण देखील घेत आहे. त्यामुळं आता हा बायोपिक कधी येतो याची प्रेक्षकांना ओढ लागली आहे.