71 वर्षांच्या आजीला समोर बसवून केला 3 नातींवर रेप, धक्क्याने झाला मृत्यू

जोहन्सबर्ग : वृत्तसंस्था – साऊथ अफ्रीकेच्या क्वाजुलू-नताल प्रोव्हिन्समध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, जे संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाले आहे. येथे एका 71 वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून काही लोकांनी तिच्या तीन नातींवर रेप केला. भयंकर बाब ही आहे की, रेपच्या या घटनेच्या दरम्यान या लोकांनी महिलेला आपल्या नातींवरील रेप पाहण्यास भाग पाडले. महिलेला या घटनेचा इतका धक्का बसला की तिचा मृत्यू झाला.

डेली मेलच्या बातमीनुसार हे समजलेले नाही की, घरात किती लोक घुसले होते, मात्र मुलींच्या माहितीनुसार रेप करणारा व्यक्ती एकच होता. हल्लेखोराने 19, 22 आणि 25 वर्षांच्या तीन मुलींना बंद केले होते. यानंतर त्याने 71 वर्षीय महिलेला जबरदस्तीने फरफटत खोलीत आणले आणि तिला एका खुर्चीला बांधले. नंतर या व्यक्तीने बंदूकीचा धाक दाखवत आळीपाळीने तिनही मुलींवर रेप केला. पोलिसांच्या माहितीनुसार या धक्क्याने महिला बेशुद्ध झाली आणि नंतर तिला मृत घोषित करण्यात आले.

हार्ट अटॅकने झाला मृत्यू
पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे एखादे वैयक्तिक वैमनस्याचे प्रकरण वाटत आहे, कारण घरातून कोणतेही सामन चोरण्यात आलेले नाही. तीन तरूणींवर रेप आणि मारहाण करण्यात आली आहे. पोलीस प्रवक्ता नाकोबिल ग्वाला यांनी सांगितले की, आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. मुलींनी सांगितले की, हल्लेखोरांनी चेहरे कपड्याने झाकले होते. त्यांची आजी घटनेच्या दरम्यान धक्क्याने बेशुद्ध पडली. मुलींचे वडील जेव्हा घरी पोहचले तेव्हा त्यांना सर्व घटना समजली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. साऊथ अफ्रीकामध्ये सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य सरकारचे प्रवक्ते नोंलान्हा खोजा यांनी लोकांना विश्वास दिला आहे की, दोषींना लवकरच शिक्षा दिली जाईल.