सपना चौधरीला ‘टक्कर’ देतेय डान्सर ‘सुनीता बेबी’, कातिल अदा आणि ठुमके पाहून चाहते फिदा ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये आहे तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. परंतु सध्या डान्सच्या बाबतीत एक हरियाणवी डान्सर सुनीता बेबी ही सपनाला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. सध्या सुनीताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचे जोरदार ठुमके चाहत्यांना भावले आहेत.

सुनीताचे काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात ती आपल्या ठुमक्यांनी चाहत्यांना पागल करत आहे. तिचा जबरदस्त डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचा एक व्हिडीओ खूप पाहिला जात आहे. या व्हिडीओला 3 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडीओत सुनीता तेरी बोली में गन्ने वाला रस टपके या हरियाणवी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिचे ठुमके चाहत्यांना थिरकायला मजबूर करत आहेत.

काहींनी सुनीता बेबीचा डान्स पाहिल्यांतर तिला दुसरी सपना चौधरी असं म्हटलं आहे तर काहींनी ती सपनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे असंही म्हटलं आहे. गेल्या एका वर्षापासून डान्स करत तिनं हरियाणात तिची ओळख तयार केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like