पिल्लांसाठी उंदीर चक्क भिडला सापाशी (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  जेव्हा आपल्या लेकरांना वाचवण्याची वेळ येते तेव्हा आई ही एक योद्धा बनून लढताना आपण अनेकदा पाहिलं आहे. आईच हे रूप मनुष्यांमध्येच नाही तर पक्षी आणि इतर प्राण्यांमध्येही पाहायला मिळते. अशीच एक उंदीर आई योद्धा झालेली दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उंदीर आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी एका मोठ्या सापाच्या नाकी नऊ आणताना पाहायला मिळतं आहे.

आयएफएस सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी या व्हिडिओला शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, ‘आता हा साप पुन्हा कधीच उंदराच्या पिल्लांच्या आजूबाजूला दिसणार नाही. आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. या पृथ्वीवर मातृत्वापेक्षा मोठं हत्यार नाही.’ असं म्हटलं.

या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं की, उंदराचं एक पिल्लू तोंडात धरून साप झरझर पुढं जात आहे. तर त्याच्या मागे उंदीर पिल्ल्याला वाचविण्यासाठी धडपडत आहे. उंदराने सापाची शेपटी धरून ठेवली होती. त्यामुळे साप पुढं जाऊ शकता नव्हता. जोपर्यंत साप तोंडातील पिल्लू सोडत नाही तोपर्यंत त्याची शेपटी सोडत नसल्याचं दिसत आहे. शेवटी सापाला तोंडातील उंदराचं पिल्लू सोडून पळून जावं लागतं. हे बघितल्यावर नक्कीच वाटतं की, एक आई लेकरासाठी काहीही करू शकते.

हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आतापर्यंत हा व्हिडिओ ५ हजार वेळा पहिला गेलाय. तर १ हजारांपेक्षा अधिक लाइक्स आणि २०० पेक्षा जास्त कमेंट आल्या आहे.