Vishwajeet Kadam | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे सुखरूप आहेत. विश्वजीत कदम यांचा ताफा सांगली (Sangli) येथील पलूस तालुक्यातील नागठाणे अंकलखोप गावामध्ये पाहणी करण्यासाठी जात होता. जाताना हा अपघात (Accident) झाला आहे. मात्र, या अपघातात 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले.

राज्यभर पावसाने धुडगूस घातलं आहे. यामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये जलप्रलय झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे आपल्या मतदारसंघातील सांगलीतील अंकलखोप या ठिकाणी गाडीतून जाताना पूर परिस्थितीची पाहणी करत होते. त्या दरम्यान अचानक गावातील एक अज्ञात त्यांच्या ताफ्याच्या आडवा आला. त्याच्या बचावासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला. ती गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन धडकली. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, गाडी थेट रस्त्याच्या बाजूला जाऊन जोरात कलटी झाली आहे. विश्वजीत कदम हे सुखरूप असून ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

हे देखील वाचा

Corona Cases in Pune | दिलासादायक ! पुण्यात उपचाराधीन रुग्णसंख्येत प्रचंड घट; शहरात 916 जणांवर विविध रुग्णालयात उपचार

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक, 2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  vishwajeet kadam maharashtra state ministers convoy meets with accident near palus sangli during rain affected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update