सतत घरात कोंडून राहिल्याने होतेय ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, ‘हे’ 7 स्त्रोत जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोना महामारीमुळे सतत लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे लोकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. बाहेर कोरोनाची भिती आणि घरात राहिल्याने आर्थिक फटका अशा कैचीत लोक सापडले असताना आता सतत घरात राहिल्याने अन्य आरोग्यसंबंधी समस्या देखील वाढत चालल्याचे आढळून आले आहे. घरातून बाहेर न पडल्याने आणि सूर्यप्रकाश शरीरावर पडत नसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवत आहे.

कुणाला असते व्हिटॅमिन डी घेण्याची गरज
1 जो लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत
2 सतत केयर होम किंवा क्वारंटाइन सेंटरमध्ये असणारे लोक
3 ज्यांची त्वचा सतत कपड्यांमध्ये झाकलेली आहे
4 ज्यांच्या त्वचेचा रंग डार्क आहे

जास्त व्हिटॅमिन डी ची मात्रा जास्त झाल्यास मृत्यूचा धोका
शरीरात व्हिटॅमिन डीची मात्रा जास्त झाल्यास कॅल्शियम लेव्हल खुप वाढते, आणि कार्डियक डेथचा धोका वाढतो. म्हणून मनाने सप्लिमेंट्स घेऊ नका.

व्हिटॅमिन डीची गरज का असते
1 मजबूत दांत आणि मांसपेशींच्या विकासासाठी
2 व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात
3 याच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये रॅकेट्स नावाचा आजार होतो
4 प्रौढांमध्ये ऑस्टिमलेशा नावाच्या आजाराचा धोका वाढतो
5 इम्युनिटी कमजोर होते
6 कोणत्याही संसर्गाशी लढण्यास असक्षम

व्हिटॅमिन डी बाबत ब्रिटीश एक्सपर्टचा सल्ला
ब्रिटिश सरकारमध्ये आरोग्य आणि पोषण बाबत काम करणारी संस्था सायंटिफिक अ‍ॅडवायजरी कमिशन ऑन न्यूट्रिशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड केयर एक्सलन्सने कोरोनामध्ये व्हिटॅमिन डीबाबत भूमिकेसंबंधी रिपोर्ट तयार केला आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे म्हणणे आहे की, कोरोना महामारीच्या या काळात लोकांना दररोज 10 मायक्रोग्रॅम व्हिटामिन जरूर घेतले पाहिजे. विशेषता, त्या लोकांना जे घरातू बाहेर जात नाहीत. मात्र, पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) ने पूर्ण वर्षभर व्हिटॅमिन डीची सप्लिमेंट घेण्याचा सल्ला सल्ला दिला आहे. पीएचईचे म्हणणे आहे की, जे बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा केयर होममध्ये राहात आहे, त्यांच्यासाठी व्हिटॅमिन डी वेगळी घेणे खुप जरूरी आहे. स्कॉटलँड आणि वेल्स सरकारांशिवाय उत्तर आयरर्लंडच्या पब्लिक हेल्थ एजन्सीने सुद्धा लॉकडाऊनमध्ये व्हिटॅमिन घेण्याचा सल्ला दिला आहे.

व्हिटॅमिन डीचे स्त्रोत
1 सूर्यप्रकाश
2 मासे
3 अंडे
4 कडधान्य
5 लोणी
6 दही
7 दूध

उन्हात ही घ्या काळजी
1 सन बर्न स्किनपासून वाचण्यासाठी त्वचा झाकून ठेवा
2 सनस्क्रीन जरूर लावा

व्हिटॅमिन डीचा डोस वेगळा घेतला पाहिजे ?
व्हिटॅमिन डीच डोस वेगळा घेणे सुरक्षित नसते. यासाठी डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतेही सप्लिमेंट घेऊ नका. जर तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसपेक्षा जास्त घेतल्यास तुमच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो.

व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट घेताना हे लक्षात ठेवा
1 बाळाला (12 महिन्यांपेक्षा कमी) एका दिवसात 25 मायक्रोग्रॅमेपक्षा जास्त देऊ नये.
2 एक ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना एका दिवसात 50 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त देऊ नका.
3 प्रौढांनी 100 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त घेऊ नये.
4 ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांनी व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेऊ नये.

व्हिटॅमिन डी ची सप्लिमेंट कुठे खरेदी कराल
* ही कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते. व्हिटॅमिन डीच्या गोळ्या मल्टी व्हिटॅमिनच्या टॅबलेटच्या रूपात मिळातात.

मुले, नवजात, गरोदर महिला यांनी काय करावे
1 आईचे दूध पिणार मुलांना जन्मापासून एक वर्षापर्यंत रोज 8.5 ते 10 मायक्रोग्रॅमपर्यंत व्हिटामिन डीची सप्लिमेंट देऊ शकत.
2 एक ते चार वर्षाच्या मुलांन दररोज 10 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट देऊ शकता.
3 प्रेग्नंट आणि ब्रेस्ट फीडिंग करणार्‍या महिलांना सुद्धा प्रत्येक दिवशी 10 मायक्रोग्रॅम डोस देता येईल.

जगभरातील स्टडी काय सांगतो ?
एक स्टडीनुसार, व्हिटामिन डी मुळे व्हायरल इन्फेक्शन आणि कोविड-19 चे सिम्पट्म्स अमेलीओरेट आणि सायटोकाइन स्ट्रोमचा धोका कमी होतो. यूरोपच्या 20 देशांमध्ये व्हिटामिन डी बाबत झालेल्या स्टडीत समजले की, ज्या देशातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची लेवल कमी होती, त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसच्या कसे जास्त दिसूल आल्या. अशा लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त दिसून आले. विशेषता, स्पेन, इटली आणि स्विझर्लंडच्या लोकांमध्ये व्हिटामिन डी चा स्तर खुपच कमी आढळून आला.